नवी दिल्ली : एअर इंडिया प्रवाशांचे स्वागत 'जय हिंद'ने करणार आहे. प्रवाशांना सभ्यतेची वागणूक देत 'जय हिंद' या शब्दाने त्यांचे स्वागत करीत राष्ट्रीय भावनेला बळकटी देण्याचा या सरकारी विमान कंपनीचा उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अश्विनी लोहानी यांनी अलीकडेच फ्लाईट कमांडर्सना उद्देशून पाठविलेल्या शब्दांत 'जय हिंद' हा शब्द वापरण्याबाबत उल्लेख केला आहे. 


लोहानी यांनी नुकसानीत असलेल्या एअर इंडियाची नफा कमावण्याच्या दिशेने वाटचाल चालविली आहे. विमान कर्मचाऱ्यांनी प्रवाशांसोबत सभ्यतेने वागावे. 


चेहरा हसतमुख असावा. प्रवाशांना एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करताना चांगला अनुभव यावा यासाठी खबरदारी घेतली जावी, अशी सूचनाही लोहानी यांनी दीर्घ पत्रात केली आहे. 


कमांडर्सनी प्रवाशांशी सातत्याने जोडले राहावे. पहिल्यांदा संवाद साधताना जय हिंदने सुरुवात केली तर त्याचा चांगला प्रभाव पडू शकेल, असे लोहानी यांनी नमूद केले.