नोटा बदलतांना आता बोटाला शाई लावणार
नोटा बदलतांना आता बोटाला शाई लावली जाणार आहे, अशी माहिती अर्थखात्याचे सचिव शक्तिकांत दास यांनी दिली आहे.
नवी दिल्ली : नोटा बदलतांना आता बोटाला शाई लावली जाणार आहे, अशी माहिती अर्थखात्याचे सचिव शक्तिकांत दास यांनी दिली आहे.
अनेक जण बँकांमध्ये पुन्हा-पुन्हा नोटा बदलत असल्याचं समोर आलं असल्याने, बोटाला शाई लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
निवडणुकीच्या वेळी बोटाला शाई लावतात, त्याप्रमाणे ही शाई लावण्यात येणार आहे. मोठ्या शहरात आजपासून बोटाला शाई लावण्याचं काम सुरू झालं असल्याचंही सांगण्यात येत आहे.