उडता पंजाब वादात आता राहुल गांधींची उडी
उडता पंजाब या सिनेमावरून निर्माण झालेल्या वादात आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उडी घेतलीय.
नवी दिल्ली : उडता पंजाब या सिनेमावरून निर्माण झालेल्या वादात आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उडी घेतलीय.
पंजाबमध्ये ड्रग प्रॉब्लेम आहेच. त्यामुळे सिनेमा बॅन करून काही होणार नाही तर सरकारने त्यावर नियंत्रण आणावं, असं म्हणत राहुल गांधी यांनी कानपिचक्या दिल्या आहेत.
अभिनेत्री करिना कपूर आणि शाहिद कपूरचा 'उडता पंजाब' वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आक्षेपार्ह दृश्यही वगळण्यास सेन्सॉर बॉर्डानं सांगितले आहे. १७ जूनला प्रदर्शित होणारा 'उडता पंजाब' वादाच्या भोवऱ्यात असल्याने या सिनेमातून पंजाबचं नाव वगळावं तसेच पंजाबचा बॅकड्रॉप काढावा, अशी सूचना सेन्सॉर बॉर्डानं केली आहे. तसेच सिनेमातील आक्षेपार्ह दृश्यही वगळण्यास सेन्सॉर बॉर्डानं सांगितलं आहे.