नवी दिल्ली : सरकार 'डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी तयारी करत आहे. टेलिकॉम कंपन्यांना अशा कमी खर्च लागणारी टेक्नोलॉजीला वापरण्यास सांगण्यात आलं आहे. इंटरनेटशिवाय देखील मोबाईल बँकींग सेवा वापरता यावी यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक वर्षांपासून याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. आता मात्र सरकार अनस्ट्रक्चर्ड सप्लीमेंटरी सर्विस डेटा (यूएसएसडी) सुरू करण्यासाठी दबाव टाकत आहे. याच्या मदतीने अकाऊंट बॅलेंसची चौकशी आणि छोटी रक्कम ट्रान्सफर करता येईल.


केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत शनिवारी झालेल्या बैठकीत बँकिंग, टेलीकॉम आणि पेमेंट्स इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी उपस्थित होते. सरकारने यूएसएसडी चॅनेलला प्रोत्साहन देण्यासाठी तयारी केली आहे. टेलिकॉम कंपन्यांना सेवांना प्राथमिकता देण्यासाठी सांगण्यात आलं आहे.


यूएसएसडी चॅनेल हे इंटर-अॅक्टिव टेक्स्ट मॅसेज सिस्टम आहे. ज्याचा वापर मोबाइल फोन सब्सक्राइबर आपल्या बँकेपर्यंत पोहोचण्यासाठी करु शकता. देशात ९० कोटी हँडसेट्समध्ये ६० ते ६५ कोटी बेसिक फीचर फोन आहेत. ज्यामध्ये स्मार्टफोन सारखे अॅडवान्स फीचर्स नाही आहेत.