जनधन अकाऊंटमधून फक्त 10 हजार काढता येणार
मात्र ही वाढीव रक्कम केवायसी पूर्ण असलेल्या खातेदारांनाच काढता येणार आहे.
मुंबई : जनधन योजनेअंतर्गत खाते असलेल्या खातेदारांना आता अकाऊंटमधून महिन्याला दहा हजार रुपये काढता येतील, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलीय. मात्र ही वाढीव रक्कम केवायसी पूर्ण असलेल्या खातेदारांनाच काढता येणार आहे.
केवायसी पूर्ण नसलेल्या खातेदारांना महिन्याकाठी फक्त पाच हजार रुपये काढता येणार आहेत. दरम्यान खातेधारकाला त्यापेक्षा जास्त रक्कम काढायची असल्यास त्याची निकड बघूनच त्याला अतिरिक्त रक्कम काढून दिली जाईल असं रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट करण्यात आलंय.
जनधन खात्यात 65 हजार कोटी रुपये जमा आहेत. जनधन योजनेअंतर्गत खात्यात अधिक धनराशी जमा झालेल्या राज्यामध्ये उत्तरप्रदेश आघाडीवर आहे. उत्तरप्रदेशमधील खात्यामध्ये 10 हजार 670 कोटी रुपये जमा झालेत.