नवी दिल्ली : एअर चीफ मार्शल अरुप राहा यांनी आजजागतिक महिला दिनाचे औचित्य साधून,  येत्या 18 जून रोजी भारतीय हवाई दलात महिला लढाऊ वैमानिकांची पहिली तुकडी समाविष्ट केली जाईल, अशी घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन महिला प्रशिक्षणार्थींना यानंतर अतिप्रगत जेट विमानासंदर्भातील प्रशिक्षण देण्यात येऊन हवाई दलात समाविष्ट करुन घेतले जाण्याचे संकेत हवाई दलप्रमुखांनी दिले. 


सध्या ३ महिला प्रशिक्षणार्थींनी लढाऊ वैमानिक होण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांच्या प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा सध्या सुरु आहे. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन त्यांची तयारी पुरुष वैमानिकांच्या तोडीची झाल्यानंतर 18 जूनला 'पासिंग आऊट' संचलनाचे आयोजन केले जाईल,' असे राहा यांनी सांगितले.  


भारतीय हवाई दलातील लढाऊ वैमानिकांच्या तुकड्यांमध्ये महिलांचा समावेश करण्यासंदर्भातील प्रस्तावास केंद्र सरकारने गेल्या ऑक्‍टोबर महिन्यात परवानगी दिली होती. या प्रस्तावास मान्यता दिल्याबद्दल राहा, यांनी संरक्षण मंत्र्यांचे आभार मानले आहेत.