नवी दिल्ली : चलनातून रद्द झालेल्या 500 आणि हजार रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आलेली मुदत 30 डिसेंबरला संपलीय. मात्र या काळात नोटा बदलून घेण्यात असमर्थ ठरलेल्या अनिवासी भारतीयांना रिझर्व्ह बँकेने दिलासा दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटा बदलून घेण्याची मुदत रिझर्व्ह बँकेने वाढवून दिलीय. जे भारतीय नागरिक 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या काळात भारताबाहेर होते त्यांना 31 मार्च 2017 पर्यंत बँकेतून नोटा बदलून घेता येतील. 


तर अनिवासी भारतीयांना 30 जूनपर्यंत नोटा बदलून घेण्याची मुदत रिझर्व्ह बँकेने दिलीय. या निर्णयानुसार भारतीय नागरिकांवर नोटा बदलून घेण्यासाठी कुठलंही बंधन नसेल. मात्र अनिवासी भारतीयांना फेमा कायद्यानुसार प्रति व्यक्ती 25 हजार एवढीच रक्कम बदलून घेण्याचे बंधन आहे.