नवी दिल्ली : रेल्वे तिकिट काढताना अनेक वेळा वेटिंगची प्रतिक्षा करावी लागते. मात्र, आता प्रवाशांसाठी रेल्वेने दिलासादायक निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून आरएसी बर्थची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेचा प्रवास किमानपक्षी सुकर होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरएसी बर्थची संख्या वाढीमुळे स्लीपर क्लासमध्ये आता १० ऐवजी १४ आरएसी बर्थ असतील. त्यामुळे आता प्रत्येक डब्यात २० ऐवजी २८ लोकांना आरएसीचे तिकिट मिळणार आहे. एसी थ्री टियरमध्ये ४ ऐवजी ८ आरएसीचे बर्थ असतील. या डब्यातून पूर्वी ८ जण जात असतील तर आता त्याऐवजी १६ जण जाऊ शकतील. एसी टू टियरमध्ये आरएसीचे ४ ऐवजी ६ बर्थ असतील. म्हणजेच एसी टू टियरमधून ६ बर्थवरुन १२ जण प्रवास करु शकतील. 


याबाबत १६ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. आरएसी बर्थची संख्या वाढल्याने प्रवाशांची संख्या वाढेल पण त्यासोबतच रेल्वेच्या तिजोरीतही भर पडणार आहे. लांबलचक प्रतीक्षा यादीमुळे अनेकांना प्रवास करणे शक्य होत नाही. पण आता जास्तीत जास्त प्रवास करता यावा यासाठी रेल्वेने आरएसी बर्थची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.