लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने भाजपने विजय मिळवला. पण अजूनही उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत खूपच उत्सूकता कायम आहे. भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही. पण शनिवार लखनऊमध्ये होणाऱ्या भाजप आमदारांच्या बैठकीत यावरुन पडता उठेल. 


रविवार १९ मार्चला संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्रीपदाचा शपथग्रहण समारोप होणार आहे. लखनऊ जिला प्रशासनाने यासाठी स्मृति उपवन या स्थळाचं नाव सुचवलं आहे. या समारोहाला पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देखील उपस्थित राहणार आहेत. यूपीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये केशव प्रसाद मौर्य यांचं नाव सर्वात पुढे आहे.