हैदराबाद :  नोटबंदीचे लक्ष्य बहुतांशी प्रमाणात पूर्ण झाले असल्याचे मत वाणिज्य मंत्री निर्मला सितारमण यांनी व्यक्त केले आहे. जी रोकड बँकीगच्या यंत्रणेत नव्हती ती आता बँकेतील खात्यांमध्ये पोहचली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंग फिक्की लेडीज ऑर्गनायझेशनच्या हैदराबाद कमिटीच्या सदस्यांच्या एका कार्यक्रमात निर्मला सितारमण बोलत होत्या. या संदर्भात आकड्यांमध्ये बोलायचे झाले तर मला आणखी वेळ लागणार आहे. आता ही रोकड बँक खात्यांमध्ये पोहचली आहे. नोटबंदीनंतर किती रोख रक्कम ही घोषीत आहे आणि अघोषित आहे याचा निर्णय रिझर्व बँक करणार आहे. 


गेल्या ३० सप्टेंबरमध्ये आपले उत्पन्न जाहीर करण्याची योजना सुरू करण्यात आली होती. त्यानंतर नोटबंदी करण्यात आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बँकेत पैसे जमा झाले आहे. आता रिझर्व बँकेला ठरवायचे की किती रक्कम ही कायदेशीर आहे आणि किती रक्कमेवर दंड लागणार आहे.