नवी दिल्ली : महिला सत्र न्यायाधीशाचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली ओलाच्या चालकाला दिल्ली पोलिसांनी गुरुवारी अटक केली. मंगळवारी उत्तर दिल्लीच्या कमला नगरमधील मार्केटमध्ये ही घटना घडली.  

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला न्यायाधीशाने बुधवारी तक्रार दाखल केली असता चालक संदीप कुमारला गुरूग्राम येथून अटक करण्यात आली. महिला न्यायाधीशाच्या तक्रारीवरुन चालकाविरोधात ३५४ अ लैंगिक छळ, कलम ५०९ आणि कलम ४२७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नेमकं काय घडले ?

महिला न्यायाधीशाने न्यायालयातून घरी जाण्यासाठी मोबाईल अॅपवरुन ओलाची कॅब बुक केली. महिला न्यायाधीशाने त्याला कोर्टात येण्यास सांगितले. संदीप कुमारला महिला न्यायाधीशाला घरी घेऊन जायचे भाडे मिळाले.

महिला न्यायाधीश संदीपच्या गाडीत बसल्यानंतर तिने संदीपला काही काम असल्याने कमला नगर येथे गाडी थांबवण्यास सांगितले. मात्र संदीपने तिची मागणी फेटाळून लावली त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. वादावादी सुरू असताना ड्रायव्हरने अश्लील हातवारे केरून महिलेचे सामान गाडी बाहेर फेकून दिले असा आरोप महिला न्यायाधीशाने केला आहे.