नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णय़ामुळं झालेली अडचण अजूनही दूर होत नसल्यानं  टोलमाफीची मुदत वाढवण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं टोलमाफीच्या मुदतवाढीची घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातल्या रस्त्यांवर आणि राष्ट्रीय महामार्गांवर दोन डिसेंबपर्यंत टोलमाफीची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळं  दोन डिसेंबरपर्यंत राज्यांच्या रस्त्यांवर आणि राष्ट्रीय महामार्गांवर टोल लागणार नाही. तर तीन ते 15 डिसेंबर दरम्यान टोलसाठी पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकरल्या जाणार आहेत. त्यामुळं तुमच्याकडे असलेल्या पाचशेच्या जुन्या नोटा टोलसाठी वापरता येणार आहेत.