हरदोई : देशभरात सध्या ५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्याने जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये रांगा पाहायला मिळत आहेत. एटीएममध्ये ही पैशांसाठी लांबच लांब रांगा आहेत. रिजर्व्ह बँक आणि सरकार कॅशची कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. रोख रक्कम लवकरात लवकर पोहोचवण्याचं आश्वासन सरकारकडून दिलं जात आहे. यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या लोकांच्या भरोशावर एटीएम मशीनमध्ये पैशे टाकले जातात त्याच लोकांनी १ कोटी २२ लाखाची रक्कम गायब केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरदोईमध्ये एटीएम मशीनमध्ये १ कोटी २२ लाख ४८ हजार रुपय गायब झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी २ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर एटीएमएसचे दोन कर्मचारी गायब आहेत. सीएमएस त्या गाड्यांना सुरक्षा पुरवते ज्या गांड्याच्या माध्यमातून एटीएममध्ये पैसे पुरवले जातात.


हरदोईमध्ये ५ एटीएम मशीनमधून १ कोटी २२ लाख ४८ हजार रुपये घेऊन ते कॅश मॅनेजमेंटकडे जमा करायचे होते पण ते पैसे कॅश मॅनेजमेंटकडे पोहोचले नाहीच. पोलीस यांचा शोध घेत आहेत. पण अजून तरी कोणतीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही.