नवी दिल्ली : सरकारने काळा पैश्यावर आणखी कठोर होत आणखी एक निर्णय घोषित केला आहे. ३० डिसेंबरपर्यंत तुम्ही एकावेळी फक्त ४५०० रुपयेच बदलू शकणार आहात. 
 
आरबीआयने ही गोष्ट जाहीर केली आहे. जर तुमच्याकडे ५०० आणि १००० च्या जास्त नोटा आहेत तर तुम्ही तुमच्या खात्यात ते जमा करु शकता. त्यानंतर तुम्ही ते फक्त चेकच्या माध्यमातूनच काढू शकणार आहात. सूत्रांच्या माहितीनुसार सरकारने पुन्हा पुन्हा पैसे बदलण्यासाठी येणाऱ्या लोकांना थांबवण्यासाठी हे पाऊल उचललं आहे. बँकाबाहेर मोठ्या प्रमाणात रांगा लागत आहेत. त्यामध्ये काही लोकं पुन्हा पुन्हा नोटा बदलण्यासाठी येत आहेत.


काळा पैसा सफेद करण्यासाठी काही लोकं गरीबांना आमिष देऊन त्यांच्याकडून पैसे बदलून घेत आहेत. त्यानंतर सरकारने पैसे बदलण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या बोटाला शाई लावण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे बँकांना कळलं असतं की त्या व्यक्तीने याआधी देखील नोटा बदलल्या आहेत.