नवी दिल्ली: रोहित वेमुला आणि JNUच्या मुद्द्यावर स्मृती इराणींनी दिलेलं आक्रमक उत्तर आता वादात अडकलंय. इराणींनी महिषासूर शहीद दिनाच्या पत्रकाचं वाचन संसदेत केलं होतं. त्यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यसभेत या मुद्द्यावर इराणींना लक्ष्य करत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आलीये. दुर्गामाता हे सेलिंग टूल नाही, असं सुखेन्तू राय यांनी म्हटलंय. तर संयुक्त जनता दलाचे केसी त्यागी आणि विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनीही बिनशर्त माफीची मागणी केलीये.


 मात्र आपण केवळ पत्रक वाचल्यामुळे माफीचा प्रश्न नाही, असं इराणी म्हणल्यात.