पाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आरएस पुरा सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ गोळीबार केला.
जम्मू : पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आरएस पुरा सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ गोळीबार केला.
पाकिस्तानी सैन्याकडून आर.एस.पुरामधील सुचेतगड सेक्टरमधील अब्दुलियन गावात लहान शस्त्रांच्या सहाय्याने गोळीबार करण्यात आल्याची माहिती उपायुक्त सिमरनदीप सिंग यांनी दिली.
दरम्यान, या भागातील नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आलाय तसेच पुढील 18 तास परिस्थितीवर लक्ष ठेवले जाईल असेही सिमरनदीप म्हणाले.
पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आलेय. याआधी काही तासांपूर्वीच पाकिस्तानी सैन्याने कथुआ सेक्टरमध्ये गोळीबार केला. या गोळीबाराच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी सैन्याचे 7 जवान आणि एका दहशतवादी मारला गेला.