नवी दिल्ली : आपल्या वादात्मक वक्तव्यांमुळे नेहमी वादात असणारे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधिश मार्कंडेय काटजू यांनी पुन्हा एकदा वादात्मक पोस्ट शेअर केली आहे. 'पाकिस्तानसमोर आम्ही अट ठेवतो आम्ही तुम्हाला काश्मीर देऊ शकतो पण काश्मीरसोबत तुम्हाला बिहार देखील घ्यावं लागेल'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काटजू यांच्या वादात्मक पोस्टवर आता राजकीय वर्तुळात मोठं वादळ येण्याची शक्यता आहे. अनेक लोकांनी काटजू यांचं हे वक्तव्य बिहारचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर काटजू यांच्यावर टीका सुरु झाली आणि त्यानंतर ते बोलले की मस्करी करत होतो.


काटजूंनी फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'पाकिस्तान चला एका वेळेतच आपल्यामधील सगळे वाद संपवून टाकू. आम्ही तुम्हाला काश्मीर देऊ शकतो पण काश्मीरसोबत तुम्हाला बिहार देखील घ्यावं लागेल. ही एक पॅकेज डील आहे. तुम्हीतर पूर्ण काश्मीर आणि बिहार घ्या. नाहीतर मग काहीच नाही मिळणार. अटल बिहारी वाजपेयींनी आगरा समिटमध्ये मुशर्रफसमोर अशीच डील ठेवली होती. पण त्यांनी ती त्यांच्या मुखर्तेमुळे नाकारली. आता ही ऑफर पाकिस्तासला परत मिळत आहे.'


काटजू पुढे लिहितात की, 'एकदा अलाहाबाद यूनिवर्सिटीमध्ये माझ्या इंग्रजीच्या शिक्षकाने मला म्हटलं होतं की, भारताला धोका हा पाकिस्तानपासून नाही तर बिहारपासून आहे. मला अजूनही नाही समजलं की याचा अर्थ काय आहे. यानंतर त्यांनी असं देखील म्हटलं की बिहारच्या लोकांनी हायकोर्टात एक अर्ज दाखल करावा की आता बिहारवर कोणीही जोक्स नाही करणार'
काटजू यांच्या या फेसबूक पोस्टवरुन वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.