टॅक्सीने प्रवास महिलांसाठी सुरक्षित
महिलांची सुरक्षा लक्षात घेता आता कॅब आणि टॅक्सीमध्ये जीपीएससोबत पॅनिक बटन असणे बंधनकारक असणार आहे.
नवी दिल्ली : महिलांची सुरक्षा लक्षात घेता आता कॅब आणि टॅक्सीमध्ये जीपीएससोबत पॅनिक बटन असणे बंधनकारक असणार आहे.
तसेच टॅक्सीमध्ये सेंट्रल लॉकिंग सिस्टमलाही अनुमती नसणार आहे. गाडीमध्ये इतर प्रवाशांना महिलांच्या परवानगीने बसवण्यात येईल.
महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महिला व बाल कल्याण विकास मंत्री मेनका गांधी यांच्या प्रस्तावानूसार केंद्र मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.