चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ सुरु झाली आहे. पलानीस्वामी आणि पनिरसेल्वम एकत्र येण्याची चिन्हं आहेत. यासंदर्भात सोमवारी रात्रीपासून चेन्नईत बैठकांचं सत्र सुरु झालं आहे. AIADMKमध्ये पक्षाच्या दावेदारीवरुन ओ पनिरसेल्वम आणि व्ही के शशिकला गट आमने सामने आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 रात्री उशीरा एआयडीएमकेच्या 25 आमदारांची बैठक घेण्यात आली.. पलानीस्वामी यांच्या मंत्रमंडळातील काही मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांनी माजी मुख्यमंत्री पनिरसेल्वम यांची भेट घेतल्याचीही चर्चा आहे.


AIDMKपक्षाच्या दावेदारीसाठी ओ पनीरसेल्वम आणि व्ही के शशिकला गट आमने-सामने आलेत.


एआयडीएमके विरोधकांच्या विलीनीकरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी उर्जामंत्री के. थंगामणी यांच्या अध्यक्षतेखाली तामिळणाडू सरकारच्या वरिष्ठ मंत्र्यांनी सोमवारी बैठक झाली. या बैठकीला आरोग्य मंत्री विजय  भास्करदेखील उपस्थीत होते.