श्रीनगर : संपूर्ण देशात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह असताना काश्मीरमध्ये मात्र दहशतवाद्यांनी डाव साधलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीनगरमध्ये नौहट्टा भागात आज सकाळीच केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांवर ऐतिहासिक जामा मशिदीच्या जवळ दहशतवाद्यांनी गोळीबार करून हल्ला केला.


या चकमकीत सीआरपीएफचा एक अधिकारी शहीद झाला. अद्यापही ही चकमक सुरु आहे. या चकमकीत आतापर्यंत ९ जण जखमी झालेत.