नवी दिल्लाी :  भारतीय रेल्वेने IRCTC रेल्वे तिकीट प्रणालीमध्ये अनेक नवीन बदल आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रवाशांना  आता आपल्या आवडीच्या सीटवर बसता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच ऑनलाइन बुकिंग प्रणालीमध्येही काही बदल केले जाणार आहेत. त्या दिशेने IRCTCने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. रेल्वे मंत्रालयाने याची जबाबदारी पीएसयू क्रिस यांच्यावर सोपवली आहे.


ऑनलाइन बुकिंग प्रणालीमध्ये नविन फीचर्स जोडले जाणार आहेत. त्यानुसार तिकीट काढणे सोपे होईल. तसेच तिकीटासोबत आपल्या आवडीची सीटही बूक करता येणार आहे.


नवीन सॉफ्टवेअरनुसार रेल्वे प्रवाशांना एअरलाइन प्रमाणे सुविधा उपलब्ध करून देणार आहे.