नवी दिल्ली :  पासपोर्ट सेवा केंद्राची सेवा आता देशातील सर्व मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार आहे. मंगळवारी याची घोषणा करण्यात आली. परराष्ट्र राज्य मंत्री वी. के. सिंग यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य पोस्ट ऑफीसमध्ये आता पासपोर्ट सेवा केंद्राची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 


पासपोर्ट संदर्भातील सर्व कार्य आता प्रमुख पोस्ट ऑफिसमध्ये होऊ शकतात. 


त्यांनी सांगितले की, आता लोकांना आपल्या जिल्ह्याच्या बाहेर जावे लागणार नाही. पासपोर्टसंबंधी सर्व कामे प्रमुख पोस्ट ऑफीसमध्ये होणार आहे. 


व्ही. के. सिंग यांच्यासोबत दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हाही उपस्थित होते. असे पहिल्यांदा होते की, परराष्ट्र मंत्रालय अधिनियम अंतर्गत आपली पॉवर इतर मंत्रालयांसोबत शेअर करीत आहेत.  


परराष्ट्र मंत्रालय आणि पोस्ट विभाग यांच्या संयुक्त प्रायोगिक योजनेचे उद्घाटन कर्नाटकातील म्हैसूरच्या मुख्य पोस्ट ऑफीस आणि गुजरातच्या दाहोदच्या मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये उद्घाटन करण्यात आले. 


परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की, ही योजना यशस्वी झाली तर पुढील दोन ते ती महिन्यात देशातील प्रमुख पोस्ट ऑफीसमध्ये याचा विस्तार करण्यात येणार आहे. हळूहळू देशातील सर्व प्रमुख पोस्ट ऑफीसमध्ये ही योजना सुरू करण्यास सुरूवात करणार आहे. 


दूर संचार राज्य मंत्री मनोज सिन्हा म्हणाले, की पहिल्या टप्प्यात ३८ जिल्ह्यातील प्रमुख पोस्ट ऑफिसमध्ये ही सुविधा सुरू होणार आहे. परराष्ट्र मंत्रालय पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे. 


सध्या देशात ८९ पासपोर्ट सेवा केंद्र आहेत.