नवी दिल्ली: योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेडनं कॅडबरी आणि पार्लेला मागे टाकलं आहे. पतंजली आयुर्वेद लिमिटेड सगळ्यात मोठी एफएमसीजी ऍडव्हर्टायजिंग कंपनी बनली आहे. पतंजली ब्रँड्सच्या अंतर्गत दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींची संख्या कॅडबरी, पार्ले आणि पॉन्ड्स यांच्या जाहिरातींपेक्षा जास्त आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊंन्सिलनं याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. बीएआरसी जवळपास 450 चॅनल्सवर लक्ष ठेवतं. त्यांच्या या आकडेवारीनुसार 23 जानेवारी ते 29 जानेवारी या काळामध्ये पतंजली प्रॉडक्ट्सच्या जाहिराती 17 हजारपेक्षा जास्त वेळा प्रसारित करण्यात आल्या. तर कॅडबरीची संख्या 16 हजार एवढी होती. 


बाबा रामदेव यांच्या पतंदलीनं जाहिरातींसाठी 300 कोटी रुपयांचा खर्च केला असल्याचं बोललं जातंय. पण पतंजलीनं मात्र याचं खंडन केलं आहे.