मुंबई : योगगुरू रामदेव बाबांच्या पतंजली प्रोडक्टस् ने घराघरांत स्थान मिळवलं मात्र काही वस्तूंच्या जाहिरातींमध्ये त्यांनी फसवे आणि खोटे दावे केल्यामुळे अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड कौन्सिलनं (एएससीआय) पतंजलीचे पितळ उघडे पाडले आहे. कपडे धुण्याची पावडर आणि 'केश कान्ति' तेलाच्या जाहिरांतीवर आक्षेप घेण्यात आला आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा आपले प्रोडक्टस् कसे उक्तृष्ट आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न प्रत्येक कंपनी करत असते. पतंजलीही त्याला अपवाद नव्हता. पण इतर कंपन्यांची उत्पादनं कशी कमी दर्ज्याची आहेत या दाव्यांवरून एएससीआयनं त्यांना खडसावले आहे. मिनरल ऑइलच्या वापराने कॅन्सर होऊ शकतो, असा दावा केश कान्ति तेलाच्या जाहिरातीत केला जातो. तो पूर्णपणे बिनबुडाचा आहे. तसंच, कच्ची घानी सरसो तेलाच्या जाहिरातीतही अशाच पद्धतीनं अन्य कंपन्यांच्या तेलाचा अपप्रचार केला जात असल्याचं एएससीआय नमूद केल होत. अन्य कंपन्या आपल्या तेलात पाम तेल वापरत असल्याचा दावा पतंजली करते, तोही चुकीचाच होता.

मार्च महिन्यात ग्राहक तक्रार समितीनं (सीसीसी)  एकूण १५६ तक्रारी मिळाल्या होत्या. त्यापैकी ९० उत्पादनांच्या जाहिराती खोट्या आणि फसव्या असल्याचा शिक्का त्यांनी मारला आहे. त्याशिवाय, जॉन्सन अँड जॉन्सन, अॅमेझॉन, आयटीसी आणि अन्य कंपन्यांच्या जाहिरातीं विरोधात आलेल्या तक्रारींचीही गंभीर दखल घेतली आहे.  त्यात शिक्षण क्षेत्राशी संबंधित ३२, आरोग्य क्षेत्राशी संबंधित ३० आणि खाद्य-पेय क्षेत्रातील १० उत्पादनांचा समावेश आहे.