नवी दिल्ली :  आपल्या देशात माकडाला देवाचे रूप मानतात, हनुमानाची सेना म्हणून लोक त्यांना खायला देतात. हिंदू धर्मात माकडाला हनुमानाचे रूप समजून  त्यांची पूजा केली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण काही जण मानवता विसरून माकडांचा छळ करतात. एकाने असाच मानवतेला लाजविणारा प्रकार केला आहे. एका माकडाला खाण्याचे आमीष दाखवून हातात एका प्लास्टिकच्या पिशवीत सुतळी बॉम्ब ठेवला. त्यानंतर ती पिशवी फाडायला लागला तेवढ्यात बॉम्ब फुटला. 


बॉम्ब फुटलल्यावर माकडला जखम झाली आणि किंचाळत तो दुसरीकडे पळाला. फेसबूकवर काही फोटो टाकले त्यात माकडाला जखम झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.