मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. सध्या नोटा बदली करण्यासाठी नागरिक थोडा त्रास सहन करत आहेत. पण आता या बातमीमुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यरात्रापासून पेट्रोलच्या दरात 1.46 रूपये तर डिझेलच्या किंमतीत 1.53 रूपये कपात लागू होणार आहे. सप्टेंबरपासून सलग सहा वेळा इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव आणि रूपयाच्या परिवर्तन मुल्यात झालेल्या सुधारणेमुळे पेट्रोल, डिझेलच्या भावात कपात झालीय. 


प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि १५ तारखेस बदललेले दर जाहीर केले जातात.
देशातील इंधनाचे दर नियंत्रणमुक्त केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्या दर १५ दिवसांनी इंधनाच्या किंमतींचा आढावा घेतात. ५ नोव्हेंबर रोजी दरात किरकोळ बदल करण्यात आले होते.