नवी दिल्ली : येत्या १४मे पासून दर रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार आहेत. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, पाँडिचेरी, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि हरयाणा या ८ राज्यांमध्ये १४ मे पासून दर रविवारी पेट्रोल पंप राहणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंसोरटियम ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्स म्हणजेच सीआयपीडीनं हा निर्णय घेतलाय. सीआयपीडीकडून वारंवार केल्या जाणाऱ्या मागण्यांकडे तेल कंपन्याकडून दुर्लक्ष केले जात होते. 


कंसोरटियम ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्सच्या कार्यकारिणीचे सदस्य सुरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही काही वर्षांपूर्वी रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेतला होता. मात्र तेल कंपन्यांनी तेव्हा आम्हाला या निर्णयावर पुर्नविचार करण्यास सांगितले होते.


या निर्णयानुसार आता ८ राज्यांमध्ये दर रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवले जाणार आहेत.