नवी दिल्ली : गेल्या 35 दिवसांपासून नोटाबंदीच्या निर्णयानं त्रस्त असलेल्या जनतेला आणखी एक शॉक बसण्याची शक्यताय. उद्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घसघशीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या दोन आठवड्यात तब्बल 15 टक्के वाढ झाली आहे. 


भारताच्या कच्च्या तेलाचा दर 55 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत वर गेला आहे. त्यामुळे इंधन वितरक कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत लीटरमागे सहा रुपयांचा तोटा होत असल्याचं पुढे आलंय. त्यामुळे दर पंधरा दिवसांनी होणाऱ्या दरांच्या पुनरावलोकनात सरकारी तेल कंपन्या दर वाढवतील अशी चिन्हं आहेत.


आता हे दर वाढवताना जनतेला दिलासा देण्यासाठी सरकार इंधनाच्या अबकरी करात कपात करेल अशीही शक्यता आहे. त्यामुळे दरवाढीचा सामान्यांच्या खिशावर होणारा परिणाम कमी करण्यास मदत होईल. पण करकपात झाली तरीही पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलीटर तीन ते चार रुपये वाढतील असा तज्ज्ञांचं मत आहे.