नवी दिल्ली : वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी या मंत्री झाल्यापासून नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. मनुष्यबळ विकास मंत्री असताना स्मृती इराणींनी अनेक वाद ओढावून घेतले होते. यामुळे त्यांच्याकडून मनुष्यबळ विकास खातं काढून वस्त्रोद्योग खातं दिल्याच्याही चर्चा झाल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता मात्र स्मृती इराणी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. स्मृती इराणींचा एक फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर शेअर होत आहे. दिल्लीतल्या कॅनोट प्लेस भागात असलेल्या स्टारबक्स कॉफी शॉपमध्ये स्मृती इराणी गेल्या होत्या. 


कॉफी शॉपमध्ये स्मृती इराणींबरोबर कोणीही सुरक्षा रक्षक नव्हता. स्मृती इराणी यांना वाय दर्जाची सुरक्षा मिळते, यामुळे त्यांना 11 सुरक्षा अधिकाऱ्यांचं कव्हर मिळतं. 


स्मृती इराणींचा हा फोटो होतोय व्हायरल