नवी दिल्ली : परीक्षेआधी पुस्तकांची झेरॉक्स काढून अभ्यास करणारे बरेच विद्यार्थी आहेत. पुस्तकांची अशाप्रकारे झेरॉक्स काढणं हे कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन होतं. यावर कारवाई करावी अशा मागणीची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात करण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी काढण्यात आलेल्या झेरॉक्स कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन ठरत नाही, असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं दिला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशभरातल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 


दिल्लीतल्या पाच बड्या प्रकाशन संस्थांनी ही याचिका दाखल केली होती. झेरॉक्स दुकानं आणि संदर्भ पुस्तकांचा समावेश असणारी कोर्स पॅकेट्स दिल्ली विद्यापीठानं तयार केली आहेत. ही कोर्स पॅकेट्स प्रकाशकांसाठी असलेल्या कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता.