बारीपदा : ओडिशामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भगवान जगन्नाथ मंदिरांच्या परिसरात एका दिव्यांग अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री ११ वर्षीय मुलगी देवाच्या दर्शनासाठी मंदिरात आली होती. मंदिरात तेव्हा कोणी नव्हतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंदिराच्या परिसरात कोणी नसल्याचा फायदा घेत २८ वर्षीय युवकाने तिला देवाच्या स्नान मंडपात नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तेथून फरार झाला. पीडितेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर लोकांनी आरोपीला पकडून त्याला जबर मारहाण केली आणि पोलिसांच्या हवाले केलं.


पोलिसांनी सांगितलं की, 'मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर तिला कटकच्या एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये भर्ती करण्यात आलं.'