पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कुटुंबाला मोठा धक्का
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबाला मोठ्ठा बसलाय. नरेंद्र मोदी यांची भाची निकुंज मोदी यांचा दीर्घ आजारानं मृत्यू झालाय.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबाला मोठ्ठा बसलाय. नरेंद्र मोदी यांची भाची निकुंज मोदी यांचा दीर्घ आजारानं मृत्यू झालाय.
पंतप्रधान मोदी यांचा छोटा भाऊ प्रल्हाद मोदी यांची मुलगी निकुंज यांना हृदयविकाराचा त्रास होता. त्या 41 वर्षांच्या होत्या.
अहमदाबादच्या यूएन मेहता हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या 8-9 वर्षांपासून त्या आजारी होत्या.
नरेंद्र मोदी यांनी चीन दौऱ्यावरून परतल्यानंतर सर्वप्रथम निकुंज यांच्या तब्येतीची चौकशी केली होती, असं मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी म्हटलंय.
निकुंजबेन या मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये कुटुंबासोबत एका भाड्याच्या घरात राहत होत्या. कुटुंबात त्यांच्यामागे त्यांचे पती आणि दोन लहान मुलं आहेत. निकुंजबेन यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यांचे पती एका खाजगी कंपनीत कम्प्युटर रिपेअरिंगचं काम पाहतात. निकुंज या शिलाई आणि मुलांची शिकवणी घेऊन घरखर्चात मदत करत होत्या.