लखनऊ : समाजवादी पक्षात सध्या वाद सुरु आहेत. अखिलेश कुमार आणि काही वरिष्ठ नेत्यांमध्ये जमत नसल्याने पक्ष तुटण्याच्या मार्गावर आला आहे. याबाबतच आज सकाळी मुलायम सिंह यादव यांनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान पतंप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षातल्या कुटुंबातल्या कलहावर कडक शब्दात टीका केली आहे. एका पक्षाला कुटुंब वाचवण्याची चिंता आहे. माझ्या पक्षाला फक्त उत्तर प्रदेश वाचवण्याची चिंता आहे. असं मोदींनी म्हटलंय.


पंतप्रधान मोदी सध्या वाराणसीमध्ये आहेत. वाराणसीतल्या सभेत बोलतांना त्यांनी समाजवादी पक्षात सुरु असलेल्या वादावर टीका केली आहे.