नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा नोटबंदीच्या मुद्द्यावरुन विरोधकांना अप्रत्यक्षपणे सुनावलं आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराचं आपल्याकडे काही जणांकडून समर्थन होतंय. मात्र हे दुर्दैवी असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.


भाजप नेते केदारनाथ साहनी यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचं मोदींनी प्रकाशन केलं. देशात भ्रष्टाचाराचं समर्थन करणारा छोटासा वर्ग आहे. मात्र भ्रष्टाचाराच्या समर्थनार्थ भाषणं करणं, त्याचं समर्थन करणं, हे देशाचं दुर्दैव आहे, असं मत मोदींनी व्यक्त केलं. नैतिक मूल्यांचं पतन हे देशासाठी घातक असल्याचंही मोदी म्हणाले. भावी पिढीच्या सुरक्षिततेसाठी सर्वांना एकत्र येण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.