पाकिस्तानला धडा शिकवण्याचा पंतप्रधान मोदींनी घेतला निर्णय
विनाश काले विपरीत बुद्धी अशी जी म्हण प्रचलीत आहे ती पाकिस्तानच्या बाबतीत खरी ठरते. भारतामध्ये हिंसा पसरवण्याचा पाकिस्तानकडून सतत प्रयत्न होत असतो. शस्त्रसंधीचं पाकिस्तानकडून सतत उल्लंघन होतं आहे. भारतानेही चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या १४ चौक्या उद्धवस्त केल्या.
नवी दिल्ली : विनाश काले विपरीत बुद्धी अशी जी म्हण प्रचलीत आहे ती पाकिस्तानच्या बाबतीत खरी ठरते. भारतामध्ये हिंसा पसरवण्याचा पाकिस्तानकडून सतत प्रयत्न होत असतो. शस्त्रसंधीचं पाकिस्तानकडून सतत उल्लंघन होतं आहे. भारतानेही चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या १४ चौक्या उद्धवस्त केल्या.
पाकिस्तानकडून सतत सुरु असलेल्या कारवाया पाहता केंद्र सरकारने एक महत्त्वाची बैठक घेतली. आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान मोदींनी गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि एनएसए अजीत डोवाल यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली. बैठकीत मोदींनी सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला. भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईवर सरकारने समाधानी दर्शवली. पण सरकार आता पाकिस्तानकडून सतत होणाऱ्या गोळीबाराला वेगळ्या प्रकारे उत्तर देण्याच्या तयारीत दिसत आहे. पाकिस्तानला नुकसान कसं होईल याबाबत बैठकीत चर्चा झाली.
बैठकीत एनएसए अजीत डोवाल यांनी काही गोष्टी मांडल्या. सूत्रांच्या माहितीनुसार त्याची लवकरच अंमलवजावणी होणार आहे. पाकिस्तानमधून होणाऱ्या सतत घुसखोरीच्या प्रयत्नाला आळा घालण्यात येणार आहे. काश्मीरी खोऱ्यात कुटीरतावादी नेते शाळा सुरु होऊ देत नाही आहेत. शाळांना आग लावली जात आहे. एका प्रिन्सीपलच घर जाळण्याचा देखील प्रयत्न झाला. ही गोष्ट पंतप्रधानांनी गंभीरपणे घेतली. याबाबतीत जम्मू-काश्मीर सरकारकडून अहवाल मागवण्यात आला आहे.
पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात ८ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ५ महिलांचा समावेश आहे. १५ लोकं यामध्ये जखमी झाले आहेत. पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान काही मोठे निर्णय घेतील असं म्हटलं जातंय. त्यामुळे येणारी वेळ ही पाकिस्तानसाठी चांगली नसेल असं म्हटलं जातंय.