भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशातल्या शौर्य स्मारकराचं उद्घाटन करणार आहेत. भोपाळमध्ये हे स्मारक तयार करण्यात आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यप्रदेश सरकारनं त्यासाठी ४१ कोटींचा खर्च केलाय. सुमारे १२.६७ एकरावर हे स्मारक बांधण्यात आलंय. स्मारकात ६२ फूट उंचीचा शौर्य स्तंभ आहे.


हिंदी आणि इंग्रजी भाषेत सैन्याच्या शौर्याच्या कथा चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्यात आल्यात. सैन्यानं दिलेल्या 'बलिदानाची कहाणी' या स्मारकात तुम्हाला कळेल. 


सर्जिकल स्ट्राईकनंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी सैनिकांशी संवाद साधणार आहेत. या उद्घाटनावेळी त्यांच्यासोबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरही असतील. शिवाय, तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांची उपस्थितीही असण्याची शक्यता आहे. 


आजच्या तरुण पिढीला सैनिकांचं बलीदान कळावं, त्यांच्या शौर्याची गाथा सर्वांपर्यंत पोहचावी यासाठी भोपाळमध्ये एक मोठे शौर्य स्मारक असावे असे आपले स्वप्न होते, असं मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलंय.