नवी दिल्ली : पाकिस्तान धर्माच्या नावावर भारताचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या राजनाथ सिंग यांच्या वक्तव्याशी मी सहमत आहे. पण राजनाथ सिंग आणि त्यांचे बॉस नरेंद्र मोदीही तेच करत आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केली आहे. 


ट्विटरवरून राहुल गांधींनी ही प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी कठुआ जिल्ह्यात झालेल्या शहीद दिवस कार्यक्रमात हे वक्तव्य केलं होतं. पाकिस्तान धर्माच्या आधारे भारताचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. 1947 मध्ये आम्हाला धर्माच्या नावावर फाळणीला सामोरं जावं लागलं होतं. हे आम्ही विसरू शकत नाही, असंही राजनाथ सिंग म्हणाले आहेत.