नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्तीसगडमध्ये वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिलीय, मोदींनी त्यासंदर्भातलं ट्विट केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठं यश मिळालंय. मात्र उत्तर प्रदेशातल्या विजयाचं अभिनंदन किंवा सेलिब्रेशनचं ट्विट करण्याआधी जवानांच्या श्रद्धांजलीचं ट्विट केलंय. 


या ट्विटद्वारे त्यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहत या काळात आम्ही शहीद जवानांच्या कुटुंबियांसह आहोत असे त्यांनी ट्विटरवर म्हटलेय़. त्यासोबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली असून सुकमामधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असेही पंतप्रधान ट्विटरव म्हणालेत. 


आज सकाळी छत्तीसगडमधल्या सुकमामध्ये नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत नऊ जवान शहीद झाले होते.