कानपूर: कानपूरच्या 10 वर्षांच्या आदिताला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र पाठवलं आहे. या पत्रामध्ये मोदींनी आदितीचे धन्यवाद मानले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी आदितीनं सरकारनं सुरु केलेल्या योजनांचं कौतुक करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहीलं होतं, या पत्राला मोदींनी उत्तर दिलं आहे. तुझ्या सकारात्मक आणि आशादायी विचारांबद्दल धन्यवाद असं मोदींनी आदितीला लिहिलेल्या पत्रात म्हंटलं आहे.  



मोदींनी मला पत्र पाठवल्यामुळे मी आनंदी आहे, त्यांना मी यापुढेही पत्र पाठवीन आणि सल्ला देईन अशी प्रतिक्रिया आदितीनं दिली आहे. दरम्यान पंतप्रधानांनी आपल्या मुलीला पत्र पाठवल्यानं मला आश्चर्याचा धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रिया आदितीच्या आईनं दिली आहे.