नवी दिल्ली : उरीवरील  दहशतवादी हल्ल्यानंतर  पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या तयारीर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्करप्रमुख, नौदलप्रमुख आणि हवाई दल प्रमुखांची भेट घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या '7 लोककल्याण मार्ग' या निवासस्थानी ही बैठक पार पडली. गेल्या रविवारी उरीमधील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात 18 जवान शहीद झाले. यानंतर भारत आणि पाकिस्तानातील राजनैतिक संबंध ताणले गेलेत. 


पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांना पराष्ट्र मंत्रालयाने समन्स बजावत समज दिली होती. तसंच या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनीही काश्मीर प्रश्नी रडगाणं गायलं होतं. 


या सर्व पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. विशेष म्हणजे आज केरळमधील कोझिकोडा इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा होतेय. या सभेत ते उरी हल्ल्याप्रश्नी काय बोलणार याकडे सा-यांचं लक्ष असतानाच पंतप्रधानांनी लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत केलेल्या चर्चेनं सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचलीये.