वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौ-यावर जाणार आहेत. या दौ-यात पंतप्रधान अनेक योजनांचा शुभारंभ करतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाराणसीत 51 हजार कोटी खर्च करुन 1500 किमीच्या गॅस पाईपलाईन योजनेचं पंतप्रधान उदघाटन करतील. अलाहाबाद-वाराणसी रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरण योजनेचा शुभारंभही होणार आहे.


वाराणसीवर आधारित एका टपाल तिकीटाचंही पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात येईल. वाराणसीआधी पंतप्रधान बुंदेलखंडमधील महोबा इथं जाहीर सभा घेतील. 2017च्या उत्तर प्रदेश निवडणुकीआधी पंतप्रधानांच्या 8 परिवर्तन रॅलींपैकी ही पहिली रॅली असणार आहे.