गरिबांना धोका देणारे जेलमध्ये जाणार - मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या नोटबंदीच्या निर्णयाचं पुन्हा एकदा समर्थन केलंय.
मुरादाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या नोटबंदीच्या निर्णयाचं पुन्हा एकदा समर्थन केलंय.
बँकेतील गर्दी हळूहळू कमी होतेय. त्याचप्रमाणे मी देशातील नागरिकांकडे केवळ 50 दिवस मागितले होते आणि आता हळूहळू यामुळे रांगा कमी होतायत, असे मोदी म्हणाले. मुरादाबाद येथील सभेत ते बोलत होते.
ज्यांनी गरिबांच्या खात्यात पैसे टाकलेत. त्यांच्यावर काय कारवाई करावी याचा विचार मी करतोय. त्याचप्रमाणे त्यांना जेलमध्ये पाठवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही मोदी पुढे म्हणाले.