आसामधील निकाल ऊर्जा देणारा : नरेंद्र मोदी
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला म्हणावे तसे अच्छे दिन आलेले नाहीत. मात्र, आसाममध्ये काँग्रेसला सत्तेतून खाली खेचत एका राज्यापुरते अच्छे दिन आलेत. हा विजयाचा उत्साह भाजपला नवी ऊर्जा देणारा असेल, असे प्रतिपाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला म्हणावे तसे अच्छे दिन आलेले नाहीत. मात्र, आसाममध्ये काँग्रेसला सत्तेतून खाली खेचत एका राज्यापुरते अच्छे दिन आलेत. हा विजयाचा उत्साह भाजपला नवी ऊर्जा देणारा असेल, असे प्रतिपाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
गुरुवारी नवी दिल्लीतील भाजपच्या कार्यालयात एका राज्यात मिळालेल्या यशानंतर मोदींनी ही प्रतिक्रीया दिलेय. आसाममध्ये पक्षाला मिळालेले घवघवीत यश आणि केरळमध्ये अनेक वर्षांनंतर विधानसभेत जाण्याची मिळालेली संधी याबद्दल त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे आभार मानले.
भाजपची विकासाची विचारधारा, सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न देशातील जनतेने स्वीकारला आहे आणि त्याचे समर्थनही केले आहे. गरिबांच्या उद्धारासाठी आणि सामान्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी हा विजय आम्हाला आणखी उत्साह देणारा आहे, असे मोदी म्हणालेत.