देशाच्या पंतप्रधानांचा पत्ता बदलणार ?
देशाच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाचं नाव लवकरच बदलू शकतो. पंतप्रधान निवासस्थानाचं नाव 7 रेस कोर्स रोड (7 RCR)वरुन 7 एकात्म मार्ग असं होऊ शकतं.
नवी दिल्ली : देशाच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाचं नाव लवकरच बदलू शकतो. पंतप्रधान निवासस्थानाचं नाव 7 रेस कोर्स रोड (7 RCR)वरुन 7 एकात्म मार्ग असं होऊ शकतं.
नवी दिल्लीचे भाजपचे खासदार मीनाक्षी लेखी यांनी पीएम निवासस्थानाचं नाव बलण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या एनडीएमसीच्या सदस्या देखील आहेत. बुधवारी एनडीएमसीच्या बैठकीत हा प्रस्ताव सादर होऊ शकतो.
लेखी यांनी म्हटलं की, 'पंडित दीन दयाल उपाध्याय यांची स्मृतीदिन आणि एकात्म विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या रस्त्याचं नाव 'एकात्म मार्ग' असलं पाहिजे. त्यांच्यामते 'एकात्म मार्ग' हे नवं नाव प्रत्येक पंतप्रधानांना समाजाच्या अंतिम व्यक्तीपर्यंत घेऊन जाईल.