घर कर्जावर घमासान, पीएनबी, एसबीआय ८.५ %नी देणार होम लोन
पंजाब नॅशनल बँकेने साडे आठ टक्क्यांच्या वार्षिक दराने गृहकर्जाची घोषणा केली आहे. हा दर सर्व बँकांपेक्षा कमी आहे. तसेच स्टेट बँकेनेही याच दराने गृहकर्ज देण्याची घोषणा केली पण यासाठी अनेक अटी देण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेने साडे आठ टक्क्यांच्या वार्षिक दराने गृहकर्जाची घोषणा केली आहे. हा दर सर्व बँकांपेक्षा कमी आहे. तसेच स्टेट बँकेनेही याच दराने गृहकर्ज देण्याची घोषणा केली पण यासाठी अनेक अटी देण्यात आल्या आहेत.
नोटबंदीनंतर बँकांच्याबाहेर पैसे घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या, आता गृहकर्जासाठी बँकाबाहेर रांगा लागण्याची शक्यता आहे.
सध्य स्थितीत पंजाब नॅशनल बँक ८.५ टक्क्यांनी वार्षिक दराने गृहकर्ज देत आहे. यापूर्वी हा दर ९.२ टक्के होता. यामुळे २० वर्षांसाठीच्या ५० लाखांच्या कर्जावर मासिक हप्ता ४५ हजारावरून घटून ४३३९१ रुपये होणार आहे. त्यामुळे एकूण २२४० रुपयांचा फायदा होणार आहे.
नव्या दराचा फायदा नव्या ग्राहकांना मिळणार आहे. तर ३१ मार्च २०१६ पर्यंतच्या बेस रेटवर कर्ज घेतले आहे. त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुक्लासह नव्या दरावर जुने कर्ज आणण्यासाठी अर्ज करू शकणार आहे.