दिग्गज नेत्यांचं टेन्शन वाढलं, निकालाला उरले अवघे काही तास
गेल्या दोन महिन्यांपासून सा-या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागणार आहे.
नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून सा-या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून पाच राज्यातील मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये सत्ता कुणाची याचा फैसला होणार आहे. उत्तर प्रदेशसह गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात भाजपचं सरकार येणार असल्याचा कौल विविध एक्झिट पोलनी दिलाय. तर पंजाबमध्ये प्रस्थापितांविरोधी लाट जोरात असल्याचं दिसंतय. पंजाबमध्ये काँग्रेस मुसंडी मारणार असून अकाली दल आणि भाजपचं पानीपत होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळं निकालसुद्धा एक्झिट पोलनुसारच समोर येणार का याची उत्सुकता लागलीय.