नवी दिल्ली : नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून नेपाळी लोकांकडे असलेले जुन्या भारतीय नोटा नवीन नोटांमध्ये बदलून देण्याची विनंती केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी यांच्यासोबत पाच मिनिट झालेल्या चर्चेत प्रचंड यांनी म्हटले की नेपाळी नागरिकांकडे ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटांचा भंडार आहे. 


नेपाळचे हजारो लोक भारतात रोजगारासाठी येतात. अनेक लोक इलाजासाठी भारतात येतात रोजच्या जीवनावश्यक गरजांसाठी भारतीय बाजारांवर अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात भारतीय नोटा आहेत, ज्या चलनाच्या बाहेर गेल्या आहेत. 


काही धार्मिक पर्यटक आणि सीमेवर व्यापार करणाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात बंदी झालेल्या नोटा आहेत. प्रचंड यांनी आपल्या वेबसाइटवर म्हटले की भारताने नेपाळी जनतेकडे असलेल्या चलनाचा विचार करून त्यांचे नोट बदलण्याचा भारताने व्यवस्था केली पाहिजे.  


यावर उत्तर देताना मोदी म्हटले की यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल. अर्थमंत्री नेपाळच्या अर्थमंत्र्याशी बोलणार आहेत. 


भारताने नोटांवर बंदी केल्यानंतर नेपाळ राष्ट्र बँकेने नोटांवर बंदी घातली, तसेच नेपाळच्या अर्थ मंत्रालयाकडे भारताचे ५०० आणि १००० च्या नोटांमध्ये ३ कोटी ३६ लाख रुपये आहे.