केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तावाढीला राष्ट्रपतींची मंजुरी
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीनंतर खुशखबर मिळाली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन टक्के महागाई भत्ता द्यायला राष्ट्रपती प्रणब मुखर्जींनी मंजुरी दिल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीनंतर खुशखबर मिळाली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन टक्के महागाई भत्ता द्यायला राष्ट्रपती प्रणब मुखर्जींनी मंजुरी दिल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांबरोबरच केंद्रीय पेन्शन धारकांनाही हा महागाई भत्ता मिळणार आहे. या वाढलेल्या महागाई भत्त्याचा फायदा 50.68 लाख कर्मचारी तसंच 54.24 लाख पेन्शन धारकांना मिळणार आहे.
याआधी केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू केला होता आणि आता परत एकदा दोन टक्के महागाई भत्त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मात्र अच्छे दिन आल्याचं चित्र आहे.