लोकसभा, विधानसभांच्या निवडणुका एकाचवेळी घ्या : राष्ट्रपती
देशात एकाचवेळी लोकसभा आणि राज्यांतील विधानसभा निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर सर्वपक्षांनी विस्तृत चर्चा करून निर्णय घ्यावा, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे.
नवी दिल्ली : देशात एकाचवेळी लोकसभा आणि राज्यांतील विधानसभा निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर सर्वपक्षांनी विस्तृत चर्चा करून निर्णय घ्यावा, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने दिल्लीत सर्वोदय विद्यालयातल्या विद्यार्थांसमोर व्याख्यान देताना राष्ट्रपतींनी एकाचवेळी निवडणुकांच्या संकल्पनेला संमती दाखवताना हे विधान केले आहे. 45 मिनिटे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एका विद्यार्थ्यांनेच याविषयी राष्ट्रपतींना प्रश्न विचाराला होता.
देशात वेगवेगळ्या वेळी होणाऱ्या निवडणुकांच्या काळात आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे सरकारी निर्णयप्रक्रिया जवळपास ठप्प असते. एकाचवेळी निवडणुका झाल्या तर एकाचवेळी आचारसंहिता लागू होईल आणि निर्णय प्रक्रियेला खीळ बसणार नाही, असेही मत राष्ट्रपतींनी व्यक्त केले. अर्थात देशाच्या राजकीय स्थैर्यासाठी असे निर्णय घेताना सर्व राजकीय पक्षांची सहमती आवश्यक असल्याचे सांगयायला राष्ट्रपती विसरले नाहीत.