उत्तराखंड : आमदारांच्या खरेदीचा प्रकार हरीश रावत यांच्या स्टिंगमधून उघड झाल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. भाजपचे महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी याच संदर्भात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान उत्तराखंडमध्ये कलम 144 लागू करण्यात आली आहे.